Skip to main content

Posts

Featured

मन वेल्हाळ पाखरू: भाग १

पहिल्यांदाच अभ्यासिकेतल्या मुलांसमोर पेणंद गावात मी एक प्रेझेंटेशन करत होतो. शाळेतल्या खोलीत छानपैकी अंधार आम्ही केला होता. प्रोजेक्टर स्क्रीन लावली होती. आणि स्क्रीनवर एक रानपिंगळ्याचा मजेशीर फोटो होता. त्याच्याशेजारी पिपिटीचं शीर्षक.  'पक्षी आपले मित्र'  रानपिंगळ्याच्या पहिल्याच फोटोपासून मुलांचे लक्ष स्क्रीनवर दिसणाऱ्या पक्ष्यांच्या आकर्षक फोटोंवर खिळले होते. ओळखीचा पक्षी दिसला की ती आनंदाने चीत्कारत होती. त्याचे आदिवासी बोलीतील नाव उच्चारत होती. प्रत्येक पक्ष्याच्या फोटोबरोबर त्याच्यावरील माहितीची देवाणघेवाण करत प्रेझेंटेशन चालले होते. होता होता इंडियन रोलर या अत्यंत आकर्षक रंगाच्या, मोहक पक्ष्याचा फोटो स्क्रीनवर आला. हा माझ्या आवडत्या पक्ष्यांपैकी एक. त्याच्या पंखांची निळाई पाहून मुले फार अचंबित होतील, असा माझा कयास होता. पण मुलांनी तो अगदी मोडीतच काढला. रोज संध्याकाळी खेळायला येणाऱ्या गावातल्याच एखाद्या ओळखीच्या सवंगडीला पाहिल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.  "हा पक्षी तुम्ही कदाचित पाहिला नसेल; कारण हा पक्षी आपल्या गावात -"  "पाहिलाय दादा. आपल्या ग

Latest Posts

कोमल... पण कणखर!

अभ्यासिकेत भरली विठ्ठल नामाची शाळा